Common fundas to live life आयुष्य जगण्याचे काही कॉमन तत्त्वे
प्रत्येक व्यक्तीचे आयुष्याबाबतचे आराखडे, तत्त्वे, फंडे हे अगदीच वेगवेगळे असूच शकतात. पण आपण सर्व आयुष्य कशासाठी जगतो?
सर्वसामान्य माणसाचे ध्येय हे आयुष्यात आनंद, यश, स्वास्थ्य मिळवणे हेच असते नाही का?
मग आयुष्यात जर हे सर्वे मिळवायचे असेल तर काही महत्त्वाचे फंडे सर्वां करिता ढोबळ मानाने सारखेच आहेत.
आयुष्याचे काही 'फंडे' किंवा तत्त्वे
कधीच स्वतःची तुलना इतरांशी कर नका.
प्रत्येक माणसाचा प्रवास हा वेगळा असतो. प्रत्येक माणसाची जडण घडण, फॅमिली बॅगराऊंड हे टोटली वेगवेगळे असते. त्यामुळे एकमेकांबरोबर कुठल्याही प्रकारची तुलना करणे म्हणजे मूर्खपणाचं आहे. आपली कालची आणी आजची प्रगती ह्या मध्ये तुलना करा व पुढे जा. उगाचच दुसऱ्यांचा हेवा करणे चुकीचे आहे.
यश हे सातत्यानेच येते
आपण ज्या करियर मध्ये आहोत किवा जे काही शिकत आहोत ते सोडू नका. स्मॉल स्टेप्स घ्या. सतत पुढे जा. जे पाहिजे ते मिळविणे हा एक प्रवास आहे. प्रत्येक स्टेशन तर येणारच.
नकारात्मक वातावरणा पासून दूर राहा.
Positive राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नेगेटिविटी लगेच attract होते. मनाची शांती टिकवायची असेल तर react न होता respond करा. कुठे आणि केव्हा कसे वागायचे हे ज्याला समजले तो आपली ऊर्जा योग्य ठिकाणीच वापरेल व मानसिक शांती मिळेल व आनंदित आयुष्य जगेल.
आयुष्यातील नवीन बदलांचा स्विकार करा.
आरोग्यंम धनसंपदा !!
सातत्य टिकवा (सतत काहीतरी नवीन शिका)
आज आणी आत्ता मध्ये जगा
आपण सर्व खूप वेळेस आपले अर्धे आयुष्य भूतकाळात किवा भविष्यकाळात जगत असतो. आज मध्ये जगायचे विसरून जातो. जे क्षण पुन्हा कधीच येणार नसतात. आयुष्य आत्ता ह्या प्रत्येक क्षणी जगा .छोट्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्या.
Comments
Post a Comment