Overthinking अतिविचार
Overthinking अतिविचार/मनाची वटवट आणी मानसिक आरोग्य!!!
विचार येणे ही एक सामान्य गोष्ट आहे पण जेव्हा हे विचार एकाच विचारा बद्दल जेव्हा जाळे विणायला सुरवात करतात तेव्हा आपण कधी त्या जाळ्यात अडकतो तेच कळत नाही.
अतिविचार ही एक मनाला लागलेली सवय आहे. हे विचार एक तर भूतकाळातले किवा भविष्यातील असतात. ज्याच्यावर आपले काहीच नियंत्रण नसते. भयावह कल्पना, जुन्या घटनांमध्ये सतत घुटमळत राहणे, पुढे कसे होणार, माझे काय होईल, मी आजारी पडले तर?? हा असे का बोलला? माझ्याच बरोबर असे का घडले? असे हजारों विचार माणसाला अक्षरशः मानसिक आजाराकडे नेतात. Anxiety, डिप्रेशन अगदी अंगवळणी पडलेले शब्द आहेत. भावनांना अनुभवणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे पण भावना च्यां आहारी जाणे किंवा त्यांना कवटाळून बसणे, भावनाआपल्यावर। भारी होणे ही एक मानसिक कमजोरी आहे.
खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा येतो, कामात लक्ष लागत नाही, रोजचे रुटीन आयुष्य जगणे सुद्धा कठीण होऊन बसते. नातेसंबंध बिघडतात,अबोला वाढतो, एकटेपणा वाढतो. माणूस आतून तुटतो. कधी कधी तर आपण स्वतःचाच तिरस्कार करतो, स्वतःलाचं सगळ्याबद्दल जबाबदार मानतो. स्वतःच स्वतःला दुत्कारतो ,पीडित बनतो. दुसर्यांना कदाचित ह्याचा अंदाज सुद्धा नसतो की, तुम्ही काय मानसिक ताणातून जात आहात. तुमच्या बरोबर काय घडतं आहे. पण तेही पूर्ण पणे ह्याला जबाबदार नसतात.
मोकळेपणाने बोला ,लिहून काढा professional मदत घ्या.
स्वतःला फर्स्ट priority द्या .
कुठलीही गोष्ट वाईट नसते पण अति तिथे माती. सकारात्मक mindset ने खूप काही बदलू शकते.
एकंदरीतच अतिविचार केल्यामुळे आपले नुकसानच होते.
पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. ह्याचावर काम केल्याने ही सवय नियंत्रणात येते.
वर्तमानात राहणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. विचार हे येणारच, पण आपल्या नियंत्रणात काय आहे व काय नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. घडलेल्या घटना तर आपण बदलू शकत नाही आणि पुढे काय होणार हे निश्चित माहीत नाही .
तुम्ही म्हणाल बोलणे खूप सोपे आहे पण करणे तेवढेच कठीण. समजू शकते मी ..
पण मला माझे मानसिक आरोग्य चांगले ठेवायचे असेल, आनंदी ठेवायचे असेल तर मलाच माझ्यावर काम करावे लागेल. मलाच माझी काळजी घ्यावी लागेल..बरोबर ना?
चला तर मग कामाला लागू यात..
मी माझे आयुष्य बदलू शकते. माझे मन माझा सर्वात चांगला मित्र आहे. मी जशी आहे तसे मी स्वतःला स्वीकारते. मी माझ्यावर खूप प्रेम करते. स्वतःला जो पर्यंत आपण स्वीकारत नाही आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी समोरच्याला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही सतत मनात कुढत राहणार सतत विचार येतच राहणार...
सेल्फ केयर.. स्वतःची
काळजी घेणे, स्वतःला वेळ देणे स्वतःला महत्व देणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि खूप सुंदर पण आहे. नाती निभावताना आपण आपले सर्वस्व पणाला लावतो पण स्वतःशी स्वतःच असलेले नात कधी उघडताच नाही. कायम रिकाम वाटते. सतत दुसऱ्यावर भावनिक दृष्ट्या अवलंबून राहावे लागते. ती सवयच होऊन जाते आणी नाती गुदमरायला लागतात. अशी नाती मग ती कितीही जवळची असली तरी दम तोडायला लागतात. निकोप, सुदृढ़ बहरलेली नाती हे आयुष्यभराचे स्वप्नंच राहते.
सगळ असूनही आयुष्य बेरंग होते. नाती ही पण दुतर्फी असली पाहिजे एकतर्फी नाती फक्त दुःख देतात. स्वतःला हरवून दुसर्याला आपले सर्वस्व देऊ नका. Boundaries ठेवा, स्पेस द्या स्वतःला अणि समोरच्याला पण. नाते फुलू देत,बहरू देत, वेळ द्या.
अतिविचार पासून सुरू झालेला हा ब्लॉग आता आयुष्यातील किती घड्या उलगडत जातो बघितले ना..आपले आयुष्यच विचारावर अवलंबून आहे.
मनातील असंख्य विचार हे आपल्याला घडवू पण शकतात आणी आयुष्याची वाट पण लावू शकतात.
खर सांगू का.. जेव्हा आपण आतून strong असतोना तेव्हा जगण्याची मज्जाच काही और असते. हे अति विचार वैगेरे आपले काहीच बिघडू शकत नाही. मी स्वतःला त्रास देणार नाही हा मंत्र रोज जपा. मीच माझ्या त्रासाला कारणीभूत आहे हे स्विकारा.
हेच सत्य आहे. समोरचा एकदाच अपमान करतो पण आपण तोच अपमान मनात मरेपर्यंत फील करत असतो. किती मोठे ओझे घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो.
थोडे स्वार्थी व्हा. नको असलेले विचार फेकून द्या. कचरा साफ करा. नुसते आलिशान घर असून चालत नाही. मन पण आलिशान ठेवा, स्वच्छ ठेवा, आनंदाला आत येऊ द्यात.
एक सांगू का कुणीही तुम्हाला कायमचे आनंदी ठेऊ शकत नाही. आनंद ही एक मनाची स्थिति आहे आणि ती आपल्या आत आहे. मीच मला आनंदी ठेऊ शकते दूसरे कोणीही नाही.
आशा आहे की माझा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल.
धन्यवाद!
Comments
Post a Comment