Empathy/सहानुभूति
सहानुभूती आणि अति-संवेदनशीलता: एक वैयक्तिक अनुभव
सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणे. पण तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का, की तुम्ही पण समोरच्या व्यक्तीच्या वेदना अगदी तशाच आणि तितक्याच तीव्रतेने अनुभवल्या जशा ती व्यक्ती स्वतः अनुभवत असेल?
मी हे बऱ्याचदा प्रत्यक्ष अनुभवलं आहे. हे किती भयावह असू शकतं हे सांगणं कठीण आहे, कारण त्याचा खूप मानसिक त्रास होतो. माझ्या गावातील शेजाऱ्यांचा एकुलता एक सतरा वर्षांचा मुलगा अपघातात जागीच वारला. त्याला लहानपणापासून पाहिलं असल्यामुळे माझ्यासाठी तो एक प्रचंड धक्का होता. मी सतत ते दुःख स्वतः अनुभवत होते; सारखं रडू येत होतं आणि आतून कुठेतरी तीव्र वेदना होत होत्या.
अशाच भावनांचा अनुभव मला वारंवार येतो. या व्यक्ती माझ्या रक्ताच्या नात्यातील नसल्या तरी ओळखीच्या असतात. स्पष्ट सांगायचं तर, मी त्या मुलाच्या आईच्या भूमिकेत शिरून ते दुःख अनुभवले, जे अत्यंत वेदनादायक होते.
असाच अनुभव पुन्हा एकदा आला, जेव्हा माझ्या मावस बहिणीच्या पतीचे कॅन्सरने निधन झाले. मी पुन्हा स्वतःला बहिणीच्या जागी कल्पिले आणि तिला होणाऱ्या अतीव वेदना मी स्वतः अनुभवायला सुरुवात केली. तो मानसिक त्रास पुन्हा एकदा असह्य होता.
मला वाटतं, मी खूप हळवी किंवा इमोशनल असल्यामुळे मला हे सगळं इतक्या तीव्रतेने जाणवत असावं. या भावना मनाला खूप खोलवर जखम करतात. कालांतराने त्यांची तीव्रता कमी होते, पण त्या घटनेची आठवण झाली की पुन्हा तितकाच त्रास होतो.
अशी मी एकटीच नसेल. बरेच जण असे empathic overloaded असतील. स्वतःवर खूप काम करावे लागते पुन्हा पूर्ववत व्हायला.
असो मी माझे हे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले आहेत. तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का? नक्की कळवा.
धन्यवाद!!
Comments
Post a Comment