मनाचा प्रवास!!!
मनाचा प्रवास!!!
मन कधी शांत सरोवर,
तर कधी वादळाचा आवाज,
कधी हसू लपलेलं डोळ्यात,
तर कधी अश्रूंना नाही लाज.
इच्छा खूप असतात आत,
पण मावत नाहीत शब्दात,
स्वप्ने ,उंच भरारी घेण्याची,
पण पाय कधी कधी थांबून जातात.
जगणं म्हणजे फक्त श्वास नाही,
भावनांना तराजूत तोलताना
सौदा होतो इच्छेचा ,
कधी हरवते मी स्वतःला,
तर कधी सापडते मीच माझी मला.
थोडं थांब, स्वतःकडे पहा,
तुझ्यातच आहे ताकद सगळी
जग जिंकायचं असेल तर,
आधी कर मनाशी मैत्री...
Comments
Post a Comment